Breaking News

पारनेर तालुक्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा ५८३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकरा जणांना अटक.

पारनेर तालुक्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा ५८३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकरा जणांना अटक.पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यांमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला यावेळी अकरा जुगाऱ्याना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले त्यांच्याकडून ५८३१० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील बाबर मळ्यात जुगार चालू असल्या बाबतची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला यावेळी आरोपी सोमनाथ बाळू बाबर अनिल गोपीनाथ बाबर शिवाजी नारायण बाबर बाळू अंबर बाबर हे हार-जीत चा जुगार खेळत असताना आढळून आले त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व २४२० रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आरोपी विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे जुगार चालू असल्याबाबतची माहिती गुप्त बातमीदार मार्फत पोलिसांना मिळाली त्यानुसार येथे छापा टाकण्यात आला त्यावेळी आरोपी शिवाजी वसंत गायकवाड सदाशिव गोविंद उचाळे बाळू दगडू उचाळे पोपट विकास चासकर म्हातारबा महादू उचाळे शंकर विठ्ठल दाते सूरेश खंडू घोडे हे जुगार खेळत असताना आढळून आले त्यावेळी त्यांच्याकडून २८९० रुपये रोख रक्कम ५० हजार रुपयाची दोन दुचाकी वाहाने ३ हजार रुपये चे मोबाईल असा एकूण ५५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.