$type=ticker$snippet=hide$cate=0

सिडको घरांचा ताबा मे महिन्यात मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : करोनामुळे एक वर्षे रखडलेल्या सिडकोच्या महागृहनिर्मिती प्रकल्पातील घरांचे बांधकाम मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संच...



मुंबई : करोनामुळे एक वर्षे रखडलेल्या सिडकोच्या महागृहनिर्मिती प्रकल्पातील घरांचे बांधकाम मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले आहेत. मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यास एक मे रोजी या प्रकल्पातील भाग्यवंताच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सिडको परिवहन आधारित गृहसंकुलांवर भर देणार असून ट्रक टर्मिनल, बस व रेल्वे स्थानकांजवळील मोकळ्या जागेत ही घरे बांधली जाणार आहे. या घरांना काही सामाजिक संस्थांचा विरोध आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत सिडकोने घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी दोन लाख घरे बांधली जाणार होती पण त्याची संख्या आता कमी करण्यात आली आहेत. खारघर, तळोजा, कळंबोली, वाशी, नवीन पनवेल येथे या घरांच्या कामांना सुरुवातदेखील झाली आहे. कामाचे स्थळ आणि राहण्याचे ठिकाण यातील अंतर कमी व्हावे यासाठी परिवहन आधारित घरांचा सिडकोने प्रस्ताव तयार केला असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी शुक्रवारी या स्थळांची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत काढली होती. त्यानंतर ९ हजार २४९ घरांची सोडत गेल्या वर्षी काढण्यात आली. या घरांच्या बांधकामाची पाहणी करताना हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश डॉ. मुखर्जी यांनी दिले आहेत. या घरांचे हप्ते ग्राहकांनी भरले असून करोना काळातील विलंब आकार रद्द करण्यात आला आहे.

हे हप्ते भरण्यासाठी सिडकोने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. या घरातील अध्र्या घरांचा ताबा ऑक्टोबरमध्ये दिला जाणार होता, पण मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बांधकामांना खीळ बसली होती. त्यात अनेक कंत्राटदारांचे कामगार मजूर हे गावी गेले होते.

ही कामे आता सुरू झाली असून मार्चपर्यंत ही घरे तयार होणार असल्याचा विश्वास डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मे पर्यंत या घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------------

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9939,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4142,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15308,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12389,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सिडको घरांचा ताबा मे महिन्यात मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश
सिडको घरांचा ताबा मे महिन्यात मार्चपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश
https://www.blogger.com/img/transparent.gif
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_744.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_744.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content