संगमनेर।प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर मध्ये मुख्य मार्केट यार्डमध्ये 23 नोव्हेंबरपासुन भुसार (धान्य) या शेतमालाचा विना आडत व...
संगमनेर।प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर मध्ये मुख्य मार्केट यार्डमध्ये 23 नोव्हेंबरपासुन भुसार (धान्य) या शेतमालाचा विना आडत विना खर्च नवीन खुल्या लिलाव पध्दतीचा प्रारंभ झालेला असून त्यास शेतकरी भुसार व्यापारी उत्तम प्रतिसाद देत आहे.
शेतकर्यांनाही व्यापार्यांमध्ये बाजारभावविषयी स्पर्धा निर्माण होत असल्यामुळे मालाचे मोल होत असल्याचे मोठे समाधान मिळत आहे. बुधवारी विना आडत पध्दतीने लिलावामध्ये शेतकरी चंद्रभान कोंडाजी खैरनार यांनी बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या बाजरीस प्रति क्विंटल दोन हजार उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. तसेच गहु प्रति क्विंटल 1825, हरभरा प्रति क्विंटल 4345, मका प्रति क्विंटल 1375, सोयाबिन प्रति क्विंटल 4150 असा बाजारभाव मिळाला असुन माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्यांने मालास मिळालेल्या बाजारभावाविषयी अतिशय समाधान व्यक्त केले आहे. शेतकर्यांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.