Breaking News

बांगलादेशच्या मुंशीगंज जिल्ह्यात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड

 


  • बांगलादेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
  • बांगलादेश असो कि भारत, धर्मांध बहुसंख्य असोत कि अल्पसंख्य ते हिंदूंवर आणि त्यांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या ! या घटना रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !

ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या मुंशीगंज जिल्ह्यातील सिरज्दीखान उपजिल्ह्यामध्ये श्री दुर्गादेवीच्या मंदिरातील श्री दुर्गादेवी, श्री सरस्वती आणि श्री कार्तिकेय यांच्या मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. मंदिरावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांची अद्याप ओळख पटलेली नाही; मात्र चौकशी चालू आहे, असे सिरज्दीखान पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी महंमद रिजौल हक यांनी सांगितले.

मंदिराचा परिसर मोकळा असल्याने तेथे कुंपण घालण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी काही रोख रक्कम दान स्वरूपात दिली आहे.