Breaking News

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

 - शेतीला पुन्हा फटका


औरंगाबाद/ प्रतिनिधी

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुबार पेरणी, अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी पार रडकुंडीला आला आहे. पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला असून, मोसंबी आणि डाळिंबाचा अंबिया बहारचे नियोजनही कोलमडले आहे. 

दुसरीकडे हवामान बदलामुळे हरभर्‍याच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, नाशिक जिल्ह्यात येवल्यासह निफाडमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला. तर फुलोरा धरलेल्या द्राक्ष बागांनाही याचा फटका बसला. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी पिकाला याचा फटका बसला आहे.