एमआयएम आमदाराचा हिंदुस्थान बोलण्यास नकार - भाजप आमदाराचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला! पाटणा/प्रतिनिधी बिहार विधानसभेच्या पहिल्या सत्राला सोम...
एमआयएम आमदाराचा हिंदुस्थान बोलण्यास नकार
- भाजप आमदाराचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला!पाटणा/प्रतिनिधी
बिहार विधानसभेच्या पहिल्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. त्यावेळी अनेक आमदारांनी विधानसभेत प्रवेश करताना सदनाच्या पायर्यांवर वंदन केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाच्या उमेदवारांनी हिंदुस्थान बोलण्यास नकार दिल्याने जोरदार राडा झाल्याचेही दिसून आले. एमआयएमचे आमदार हे भारत बोलण्यावर अडून होते. त्यांना हिंदुस्थान बोलण्यावर आपत्ती होती. आमदाराच्या या व्यवहारावर संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनीही आक्षेप व्यक्त केला
एमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ ग्रहण करताना हिंदुस्थान शब्दावर आक्षेप घेतला. इमान यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती. मात्र, उर्दूमध्ये भारताच्या जागेवर हिंदुस्थान शब्दाच्या वापराला त्यांनी आक्षेप व्यक्त केला आणि प्रोटेम स्पीकर यांच्याकडे भारत या शब्दाच्या वापराची मागणी केली. त्यावर आपण आपत्ती नाही तर तसा सल्ला देत असल्याचे अख्तरुल इमान म्हणाले. इमान यांनी हिंदुस्थान शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत जोरदार राडा सुरु झाला. संयुक्त जनता दलाचे नेते मदन सहनी यांनी आमदारांनी हिंदुस्थान बोललेच पाहिजे, असा आग्रह धरला. तर भाजप आमदार नीरज बबलू यांनी हिंदुस्थान बोलण्यास आक्षेप असणार्यांनी पाकिस्तानचा रस्ता धरावा. अशा लोकांना भारतात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशा लोकांनी सभागृह सोडून पाकिस्तानात जावे. हे देश तोडणारे लोक आहेत, अशा शब्दात नीरज बबलू यांनी अख्तरुल इमान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे.