Breaking News

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा

 
पुणे - मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर आता विरोधी पक्ष भाजप देखील आक्रमक झाले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर आता आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांनी राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना तीन महिन्यांपासून वेतनात कपात, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार, भविष्यासाठीची अनिश्चितता यासारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे.