मुंबई : वास्तूरचनाकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुर्ननिरीक्षण अर्जावरील सुनावण...
मुंबई : वास्तूरचनाकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुर्ननिरीक्षण अर्जावरील सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र न्यायालय रजेवर असल्याने ही सुनावणी होऊन शकली नाही, आता या प्रकरणी ५ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, सोमवारी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर २३ नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढून घेतला असला तरी फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही.
त्यामुळे त्याच्या अर्जावरही सोमवारी याबाबत निकाल येण्याची शक्यता होती.आता त्यावर येत्या ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.