Breaking News

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३५ काेराेना पाॅझिटिव्ह बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी ३५ जणांचा अहवाल मंगळवारी पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच ७०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ९८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ३४२ जणांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७३९ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ७०४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३४ व रॅपीड टेस्टमधील १ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेले रुग्णांमध्ये बुलडाणा तालुका रूईखेड मायंबा १, खामगांव तालुका निपाणा ६, बेलखेड १, लोणार तालुका सावरगांव तेली २, कोयाळी १, लोणार शहर ४, नांदुरा शहर १, मेहकर शहर ३, मेहकर तालुका सारशिव १, विठ्ठलवाडी १, बेलगांव १, लोणी गवळी १, कनका १, डोणगांव १, पांगरखेड १, मोताळा तालुका तरोडा १, सिं. राजा तालुका पळसखेड २, गारखेड १, चिंचोली ३, सिं.राजा शहर १, शेगांव शहरातील एका रुग्णाचा समाेवश आहे. बुलडाणा स्त्री रूग्णालय २, आयुर्वेद महाविद्यालय १०, लोणार ३, नांदुरा ८, जळगांव जामोद २, सिं. राजा ३, खामगांव २३, चिखली १४, मलकापूर १, शेगांव ११, दे. राजा १५, मेहकर ३, मोताळ्यातील तीन रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.