Breaking News

वडनेर हवेली मध्ये दोन लाखाचे सीताफळ बागेतून नेले चोरून पोलिसांनी फिर्याद घेण्यास केली टाळाटाळ.

वडनेर हवेली मध्ये दोन लाखाचे सीताफळ बागेतून नेले चोरून पोलिसांनी फिर्याद घेण्यास केली टाळाटाळ.
-----------------
फिर्याद देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांला केले उलट प्रश्न पोलिसांनी बागेत जाऊन केला पाहणीचा फार्स पूर्ण
-----------------
पोलीस निरीक्षकांनी दखल घेत उशिरा दाखल करून घेतली फिर्याद मात्र चोरी गेलेला माल दाखवला कमी.


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील एका शेतकऱ्याची सिताफळाच्या बागेतील दोन लाख रुपयांच्या सीताफळाची चोरी झाली ही चोरी चोरांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन केली असण्याची शक्यता आहे याबाबत या शेतकऱ्याने पोलीस स्टेशनला माहिती कळवली मात्र पोलिसांनी याबाबत फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली दुसऱ्या दिवशी काही पोलिसांनी घटनास्थळी येऊन बागांची पाहणी केली परंतु  तरीही फिर्याद घेतली नाही अखेर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी संबंधित शेतकऱ्याची फिर्याद दाखल करून घेतली.
चोरी करण्यासाठी चोर कोणतीही कला वापरून कशाची ही चोरी करू शकतो हेच यावरून दिसून येत आहे सीताफळाला बाजारपेठेमध्ये बाजारभाव चांगला आहे जवळपास ८० रुपये किलो प्रमाणे या हंगामांमध्ये या फळाला बाजार आहे मात्र त्यातच फायदा उचलत चोरांनी वडनेर हवेली येथील शेतकरी आबासाहेब बापूसाहेब वाळुंज वय ५८ यांच्या सहा एकर बागेतील दोनशे कॅरेट सिताफळ चोरून नेले जवळपास बाराशे रुपये कॅरेट प्रमाणे सीताफळाला भाव मिळत आहे यामुळे दोन लाख रुपयाची या शेतकऱ्यांची चोरी झाली आहे सिताफळ तोडणीसाठी शेतात गेल्यानंतर ही चोरी झाली असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले काही ठिकाणी शेतातच काही फळ तुटून पडलेली होती तसेच काही झाडांना पूर्णपणे फळ नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबत चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत सुपा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माहिती कळवली तसेच चोरीची फिर्याद घेण्याची विनंती केली मात्र तेथील अधिकाऱ्यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली तसेच जागेवर येऊन पाहणी करू असे म्हणत फिर्याद घेतली नाही शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळणे दूरच मात्र याबाबत साधी फिर्याद ही पोलिसांनी न घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे एकीकडे लाखो रुपयाचे झालेले नुकसान तर दुसरीकडे याबाबतचा गुन्हा नोंद होत नसल्याने शेतकऱ्याने करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे अशाप्रकारे फळांची चोरी करून चोरांचे चांगलेच फावले आहे त्यांना वचक बसण्यासाठी पोलिसांनी फिर्याद नोंदवून याबाबत तपास करणे गरजेचे असताना त्यांच्याकडून तसे होत नाही यामुळे चोर निर्धास्त असून यापुढेही अशा प्रकारच्या चोर्‍या वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी पोलिसांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दुसऱ्या दिवशी काही पोलिसांनी येऊन विचारपूस करून निघून गेले मात्र फिर्याद घेतली कि नाही याबाबत मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनिश्चितता आहे त्यामुळे चोर शोधणार कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

 शेतकऱ्याच्या शेतातील फळांची लाखो रुपयांची झालेली चोरी करणारे चोर मोकाट चोरी केलेल्या चोरांना जरब बसण्यासाठी गुन्हा नोंद करून चोरांचा तपास करणे गरजेचे आहे यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने उपाय योजना केल्या पाहिजे तसे झाले नाही तर चोरांना लगाम बसणार नाही व शेतकऱ्यांना कोणी वाली राहणार नाही.
 पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी शेतकरी गेले असता त्यांना उलट अधिकाऱ्यांनी खरंच चोरी झाली आहे का असा सवाल केला यामुळे पोलिस नेमके कोणाच्या बाजूने आहेत शेतकऱ्याला  प्रश्न विचारून फिर्याद घेतलीच नाही  लाखोच्या नुकसानीने शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमजोर असताना पोलिसांनी केलेल्या या वर्तणुकीमुळे शेतकरी नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. 
अखेर या वृत्ताची चर्चा होतात पोलीस निरीक्षकांनी त्वरित दखल घेत संबंधित शेतकऱ्याला पोलीस स्टेशनला बोलवून फिर्याद घेतली मात्र फिर्यादी मध्ये शेतकऱ्याची झालेली चोरी कमी दाखवली गेली यात ११५० किलो सीताफळ रु ७४७५० किमतीचे दाखवले आहे मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन लाखापर्यंत सीताफळाची चोरी झाली आहे.