Breaking News

वर्धा | ऑटोची दुभाजकाला धडक; ५ प्रवाशी जखमी

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने एमएच ३२ ए ४८३१ क्रमांकाचा ऑटो प्रवाश्यांना घेऊन जात होता. दरम्यान ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिली.

कारंजा. प्रवाश्यांना घेऊन जात असलेल्या ऑटो अनियंत्रित झाल्याने पाच प्रवाशी जखमी झाले(karanja auto accident ). हा अपघात बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजताचे दरम्यान घडला.

हे सुद्धा वाचा

  •  

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने एमएच ३२ ए ४८३१ क्रमांकाचा ऑटो प्रवाश्यांना घेऊन जात होता. दरम्यान ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिली. अनियंत्रित झालेला ऑटो पलटी झाला. यात 5 प्रवाशी जखमी झाला. माहिती मिळताच कारंजा पोलिस घटनास्थळी पोहोचली. जखमींना कारंजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामध्ये सचिन येसनसुरे (२१), नंदा उईके (२९), सीता येसनसुरे (७५) व अन्य दोन जखमींचा समावेश आहे. पोलिसांनी ऑटोचालकाचे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस कारवाईच्या भीतीने ऑटोचालक फरार झाला आहे.