Breaking News

कोरोना काळात अॅपलचे ९ युनिट्स चीनमधून भारतात

 

कोरोना काळात अॅपलचे ९ युनिट्स चीनमधून भारतात 

बंगळुरू
केंद्रीय माहिती प्रसारण आणि दूरसंचार मंत्री रविशकंर प्रसाद यांनी अॅपल कंपनीचं मोठ्या प्रमाणात काम भारतात आल्याची माहिती दिली. २३ व्या 'बंगळुरू टेक समिट'च्या उदघाटन सत्रात ते बोलत होते.

'कोविड काळ सुरू असतानाही अॅपलचे ९ ऑपरेशन युनिट्स चीनमधून भारतात स्थलांतरित झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्या आता पर्यायी देशांचा शोधू घेऊ लागल्या आहेत. यात अनेक कंपन्यांचा भारताकडे ओढा आहे', असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

देशात मोबाइल निर्मितीला गती देण्याच्या उद्देशाने कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी कल्पना आम्ही घेऊन आलो आहोत. या नव्या योजनेअंतर्गत आतापर्यंत समसँग, फॉक्सकॉन, रायझिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यांनी याआधीच अर्ज दाखल केले असल्याचंही प्रसाद म्हणाले.

दरम्यान, कोविड काळात तंत्रज्ञानाच्या ताकदीची सर्वांना ओळख झाली असून भारतीयांनीही अतिशय सहजपणे डिजिटल पर्यायांना अंगिकारलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू टेक समिटच्या उदघटनावेळी म्हटलं होतं.