जामखेड/प्रतिनिधी ः संत गजानन महाराज महाविद्यालयसह दोन महाविद्यालयाच्या संस्थेविरोधात आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर श्रीराम बागडे ...
जामखेड/प्रतिनिधी ः संत गजानन महाराज महाविद्यालयसह दोन महाविद्यालयाच्या संस्थेविरोधात आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर श्रीराम बागडे व गौरव बागडे पिता पुत्र 1 डिसेंबर रोजी उपोषणाला बसणार आहेत.
सदर संस्था चालकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्ताऐवज तयार करून महाविद्यालयासाठी परवाना घेतला. शासनासह मुळ जागा मालकाची फसवणुक केल्याप्रकरणी खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसार मंडळ या संस्थेच्या संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे. या शिक्षण संस्थेच्या सोनेगाव रोडवरील तीन महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी. आदी मागण्यांसाठी खर्डा येथील मुळ जागामालक श्रीराम बागडे व गौरव बागडे यांनी आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना उपोषणासंबधी निवेदन दिले आहेत.