$type=ticker$snippet=hide$cate=0

 अग्रलेख गुपकार ग्रूपला हा देश तोडायचा आहे का? अनेकदा धर्मवादी विचारसरणीच्या आहारी गेलेले लोकशाहीनियुक्त सरकार हुकूमशाहीचा अवलंब करू शकते; आ...

 अग्रलेख

गुपकार ग्रूपला हा देश तोडायचा आहे का?


अनेकदा धर्मवादी विचारसरणीच्या आहारी गेलेले लोकशाहीनियुक्त सरकार हुकूमशाहीचा अवलंब करू शकते; आणि त्या विचारांच्या आहारी गेलेली प्रजा आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेऊ शकते; हा इतिहास जगाला नवा नाही. कलम 370 आणि 35 (अ) रद्द करण्याचे काम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आणि त्यासोबतच जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन आणि त्यांना केंद्रशासित दर्जा देण्याचा निर्णयही या सरकारने घेतला होता. देशातून बहुतांश मोठ्या वर्गाने याचे स्वागत केले आहे. ते एक ऐतिहासिक पाऊल असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे. परंतु, हा बदल जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळेच मोदींच्या जुलमी राजवटीत भरडले जात असलेले हे नेतेमंडळी गुपकार ग्रूपच्या नावाखाली एकत्र आले आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा आणण्याचे स्वप्न ही नेतेमंडळी तेथील तरुणांना दाखवत आहे. वास्तविक पाहाता, या नेत्यांनी अनेक घटनात्मक पदे भूषवली आहेत. त्यामुळे त्यांनी घटनेचा सन्मान राखावा, अशी अपेक्षा आहे. परंतु, तरीदेखील त्यांच्याकडून अलिकडे जी वक्तव्ये येत आहेत, ती चिंताजनक आहे. फाळणीची जखम ताजी असताना आणि भारतात ‘विलीन’ होण्याऐवजी ‘सामील’ होण्याची भूमिका जम्मू-काश्मीरचे तत्कालिन महाराजे महाराजा हरीसिंग यांनी घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर 370 व 35 (अ) या कलमाचा अंतर्भाव राज्यघटनेत करण्यात आला होता. आपल्या अस्मितेच्या सुरक्षिततेविषयी साशंक असलेले आणि भविष्याची चिंता असलेले ‘प्रजाजन’ भारतात विलीन होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. शिवाय, या राज्याचा काही भाग फाळणीच्या वेळी ‘बंडखोरांच्या आणि शत्रूंच्या’ ताब्यात होता. त्यातच तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रांसमोर हा प्रश्‍न नेल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय परिमाण मिळाले होते. अशावेळी लोकांना ‘सुशासना’ची, संस्कृती टिकविण्याची हमी मिळावी यादृष्टीने या कलमाचा अंतर्भाव करण्यात आला होता. हे कलम हटविताना मोदी सरकारकडून असंवैधानिकपणा झाला आहे, ही बाब सत्य असली तरी गुपकार ग्रूप ज्यापद्धतीने प्रचार करत आहे, ती त्यांची भाषा देश तोडणारीच वाटते. वास्तविक पाहाता, जम्मू-काश्मीरचा एकच संदेश आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता. तो म्हणजे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाच्या संरक्षण आणि वैभवासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. गुपकार ग्रूपने ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. फक्त भारतातच लोकांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांनी काहीही बोलून वातावरण चिघळवण्याचे काम टाळले पाहिजे. घटनात्मक पदे भूषवलेल्यांनी त्यांच्या विधानांची मर्यादा राखली पाहिजे. या मुद्द्यावर ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायला हवी. गेल्या 30 वर्षांपासून सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, हिंसाचार व फुटिरतावादी शक्तींमुळे काश्मीरच्या विकासाला खीळ बसली होती. कलम 370 त्यासाठी कारणीभूत होते, असा काहींचा समज आहे. काश्मीरमधील राजकीय बदलासाठी हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे अत्यावश्यक होते, ही केंद्र सरकारची भूमिका होती. त्यामुळे मोदी सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वी सांगितलेच होते. सीमेपारच्या धोक्याचा विचार करून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला आहे, असेही शाह यांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांचे लोकशाहीत्मक अधिकार कमी होतात. हा दर्जा दिल्याने सीमेपारचा धोका कसा कमी होतो, याबाबत मात्र शाह यांनी मौन पाळले आहे. आजवर जे सीमापारचे धोके निर्माण झाले, अगदी कारगिलसकट, त्या धोक्यांना भारतीय सैन्याने या असल्या तरतुदींशिवायही समर्थपणे उत्तर दिले आहे, हा इतिहास आहे. कलम 370 रद्द केल्यामुळे एखादी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे जम्मू-काश्मीर उर्वरीत भारताशी जोडला जाईल, असेही मानले जात होते. मात्र, आता हे सगळे झाल्यानंतर केंद्र सरकारची काही गृहितके चुकल्याचे दिसत आहे. त्याचाच गैरफायदा फारूक अब्दुलासह जम्मू-काश्मिरातील सर्वच नेते गुपकार जाहीरनाम्याच्या नावाखाली एकत्र येऊन घेत असल्याचेही दिसते. कलम 370 रद्द होऊन अर्धे वर्ष सरत आले. या काळात देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरून उठलेला काश्मिरीचा विश्‍वास पुन्हा कसा मिळवायचा; तसेच, नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय यंत्रणांशी जुळवून घेण्यास त्यांना कसे प्रोत्साहित करायचे, हा मोठा प्रश्‍न आजही केंद्र सरकारपुढे आहे. जम्मू-काश्मीरमधील घटनात्मक बदल लोकांच्या गळी उतरवतानाच; तिथे प्रगती साधण्याचे आणि या प्रदेशाला भारताशी जोडण्याचे आव्हान नव्याने नियुक्त झालेले नायब राज्यपाल अद्यापही पुरेशा क्षमतेने पार पाडताना दिसत नाहीत. वास्तविक पाहाता, काश्मीरमध्ये प्रशासकीय बदल तातडीने दिसणे आवश्यक होते. पण तसेही होताना दिसत नाही. खरे तर जम्मू-काश्मीरचा विचार करता, तेथे लोकशाहीची प्रक्रिया सुरू व्हावी, असे शेजारी देश पाकिस्तानला अजिबात वाटत नाही. त्यामुळेच ते दहशतवाद पसरवत आहेत. तळागाळातील लोकशाहीच्या प्रक्रियेला धक्का लावणे व 26/11 सारख्या कटाची पुनरावृत्ती करण्याचे त्यांचे मनसुबे सुरक्षा दलाने नुकतेच उधळले. सीमेवरील घुसखोरी नियंत्रणात आली असली तरी, इतरही अनेक समस्या तेथे कायम आहेत. कलम 370 रद्द केले हे समजा अगदीच गरजेचे पाऊल होते, असे मानले तरी, त्यामुळे संभाव्य धोके कमी होतील, असे चित्र नाही. शेवटी सौहार्द आणि एकात्मकतेची जाणीव निर्माण करणे हेच अभंग राष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरते. आता सरकारने जी पावले उचलायचे ठरवले आहे, त्यातून हे साध्य होईल का? आणि त्यासाठी सरकारची भावी व्यूहनीती काय असेल आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही काय प्रतिक्रिया असेल? हे पाहणे महत्वाचे आहे. स्थानिक तरुण-तरुणींना नोकर्‍या देणे, स्थानिक उद्योजकांना संधी देणे यासारखी कामे तेथे सुरु झाली आहेत. मोदी सरकारचा निर्णय चुकला की बरोबर; हे काळच स्पष्ट करेल. परंतु, केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटवताना आपण देशाला पुन्हा एकदा दुहीच्या खाईत तर लोटत नाही ना? याचा विचार या गुपकार ग्रूपने करायला हवा.

------------------

Name

] ब्रेकिंग,850,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5545,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,2,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9969,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4146,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15353,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12448,महाराष्ट्र सातारा,22,मुंबई,3441,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3155,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://lh3.googleusercontent.com/-OqKYYeBl9Ew/X7zvnntnnWI/AAAAAAABliw/_-wUhDLBvrkTROTd9ulN1A-iIrb6s3xAACLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-OqKYYeBl9Ew/X7zvnntnnWI/AAAAAAABliw/_-wUhDLBvrkTROTd9ulN1A-iIrb6s3xAACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_835.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_835.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content