कल्याण : एका हाय प्रोफाईल सोसायट्यांच्या ग्राऊंड फ्लोअरवरुन पोलिसांकडून कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागल्याने एकच...
कल्याण : एका हाय प्रोफाईल सोसायट्यांच्या ग्राऊंड फ्लोअरवरुन पोलिसांकडून कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्वरीत या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवर विकास हाईटस् ही हाय प्रोफाईल इमारत आहे. काल (23 नोव्हेंबर) रात्री पार्किंगमधून धूर निघू लागला. हे काही रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. काही वेळ परिसरात गोंधळाची परिस्थिती होती. कल्याण फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली गेली. 3 ते 4 दुचाकी जळाल्या आहेत. फायर ब्रिगेडने आग नियंत्रणात आणली नसती, तर ही आग वाढली असती. आज सकाळी कल्याणचे एसीपी अनिल पोवार आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.