पारनेर : पदाधिकारी निवडीच्या वेळी आमदार निलेश लंके हे जितेशला घेऊन माझ्याकडे आले होते. आ. लंके म्हणजे काहीतरी वेगळं व निराळं असतं.त्यामुळे य...
पारनेर : पदाधिकारी निवडीच्या वेळी आमदार निलेश लंके हे जितेशला घेऊन माझ्याकडे आले होते. आ. लंके म्हणजे काहीतरी वेगळं व निराळं असतं.त्यामुळे यामध्ये काहीतरी वेगळं असेल याची मला खात्री झाली पण आज प्रत्यक्षात प्रचिती आली,अशा शब्दात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे यांच्यावर कौतुकाची थाप टाकली.
आमदार लंके यांचे कट्टर समर्थक असलेले जितेश सरडे हे आपल्या ओघावत्या वाणीमुळे सर्वपरिचित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी अनेक सभा जिंकल्या. युवक वर्गात तर त्यांची मोठी लोकप्रियता आहे.त्यांच्या वक्तृत्व,नेतृत्व गुणांमुळे व आमदार लंके यांच्या प्रयत्नांमुळे सरडे यांची राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
मुंबईत नुकतेच राष्ट्रवादीचे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले राज्यातील पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. या शिबीरातही सरडे यांची वेगळी झलक पाहायला मिळाली.उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून त्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचे कौतुक करीत असेच काम करीत राहिला तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांत पक्ष तुझ्यावर मोठी जबाबदारी सोपविल असेही खासदार सुळे म्हणाल्या. या प्रशिक्षण वर्गाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, पूर्वाताई वळसे उपस्थित होते.