Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

 - खा. सुप्रिया सुळेंकडून डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे आभार


मुंबई/ प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतेच त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस्अ‍ॅप स्टेट्स ठेवत याबाबतची माहिती दिली.

अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर सोमवारी अजित पवारांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यानतंर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. खा. सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि डॉक्टरांचे आभार असे लिहिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा टेस्ट केली असता तो अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

--------------------