Breaking News

बिहारमध्ये पुन्हा नीतीशकुमार सरकार?

- एबीपी व टाईम्स नाऊच्या अनुसार बिहार विधानसभा त्रिशंकु
- एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज
- एनडीएला 120 ते 127 जागा मिळण्याचा अंदाजआघाडी जागा

एनडीए 120-127

महाआघाडी 71-81

लोजपा 12-13

अन्य 19-27


पाटणा/ प्रतिनिधी

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर विविध सर्वेक्षण संस्था व वृत्तवाहिन्यांनी आपले निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे अंदाज (एक्झीट पोल) जाहीर केले असून, पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार सत्तेवर येण्याचे सूचित केले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे येईल, असा एक्झिट पोल सर्वच सर्वेक्षण संस्थांनी दिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा नीतीशकुमार सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसच्या परफॉर्मेन्समुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाच्या खूर्चीपासून दूर राहणार असून, भाजपसोबत सरकार बनविण्याचा दावा करणारे चिराग पासवान यांनाही निवडणूक निकालात धक्का लागेल, असा अंदाज आहे. कारण, त्यांचा पक्ष 10 जागांच्या आसपास राहील, असा सर्वेक्षण संस्थांचा अंदाज आहे. काँग्रेसला किमान 19 जागा तर महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदला 52 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


त्रिशंकु संकेत!

बिहारमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. सी व्होटर-एबीपी माझा व टाईम्स नाऊच्या अनुसार, बिहार निवडणुकीचे निकाल त्रिशंकु लागणार असून, एनडीएला 104 ते 128 जागा तर काँग्रेस-राजद महाआघाडीला 108 ते 131 जागा मिळण्याची शक्यता आहे.


मध्यप्रदेशात पुन्हा ‘शिव’राज!

- पोट निवडणुकीत भाजपा 14 ते 16 जागा तर काँग्रेसला 10 ते 13 जागांचा अंदाज

मध्यप्रदेशातील पोट निवडणुकीत भाजपला 14 ते 16 तर काँग्रेसला 10 ते 13 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. तर बसपाही या निवडणूक खाते खोलण्याचा अंदाज आहे. मध्यप्रदेश पोट निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एक्झिट पोलचे अंदाज पाहाता, भाजप सरकार वाचणार असून, काँग्रेस पुन्हा सरकार बनविण्याची शक्यता धूसर आहे.