कोपरगाव/ता. प्रतिनिधी ः कोणत्याही परिस्थितीत आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्...
कोपरगाव/ता. प्रतिनिधी ः कोणत्याही परिस्थितीत आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली आहे. यापुढे कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात कोणत्याही परिस्थिती आघाडी न करता शिवसेनेकडून आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कृषी उत्पन्न बाजार निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तेव्हा कुठलेही गटातटाचे राजकारण मनात न ठेवता केवळ शिवसेना शिवसैनिक म्हणून सर्व शिवसैनिकांनी एकीची वज्रमूठ बांधून निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन झावरे यांनी केले आहे. येणार्या नगरपालिकांमध्ये बैठका घेणार आहेत. या दरम्यान स्थानिक उमेदवार व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे. जिल्हयात पक्षवाढीची संधी निवडणुकीच्या रुपाने मिळत असते शिवसेनेने चार वेळा खासदार तीन वेळा आमदार दिलेला आहे यापूर्वी कोपरगाव नगरपालिकेत शिवसेनेची कुठलीही ताकद नसताना शिवसेनेने सहा ते सात नगरसेवक निवडून आणलेले आहेत. आज राज्यात शिवसेनेचे सरकार आहे पक्षाचे चांगले काम असून पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे नवीन युवक पुन्हा शिवसेनेकडे आकर्षित होत आहे. यामुळे शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्यामाध्यमातून शिवसेना वाढीची संधी आहे. याचा लाभ आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. आज नगरपालिकेत शिवसेनेचे सात विद्यमान नगरसेवक आहेत. अनेक शिवसैनिकांचे त्यांच्या त्यांच्या भागात चांगले कार्य आहे परंतु त्यांना संधी मिळत नाही त्यांना संधी मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेनेचे आगामी काळातील विकासाचे व्हिजन हा प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. या निर्णयामुळे कोपरगावातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सर्वच शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.