रयतच्या पदाधिकाऱ्यांचे नाव वापरून माहिती अधिकार टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल चिखली/प्रतिनिधि : दि २२ नोव्...
रयतच्या पदाधिकाऱ्यांचे नाव वापरून माहिती अधिकार टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
चिखली/प्रतिनिधि : दि २२ नोव्हेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशनला रयत क्रांती संघटनेचे संदीप मुळे व सोमठाणा ग्रा पं च्या सचिव यांचा जबाब घेऊन माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 नुसार गुन्हा दाखल केला आहे,
रयतचे संदीप मुळे यांनी लेखी तक्रारीद्वारे त्यांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या करून दि ५ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी पं स चिखली यांच्याकडे सचिव ग्रा पं सोमठाणा यांची खासगी व शासकीय माहिती मिळणे बाबत माहितीचा अधिकाराचा अर्ज अज्ञात व्यक्तीने दाखल केला होता, सोमठाणा या ग्रा पं शी व सदर ग्रामसेविका यांच्याशी माझा कधीच,काहीच संबंध आलेला नसून माझ्या नावाचा, सहिचा, पत्याचा गैरवापर करण्यात आला असून मी तीन वर्षापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांचा स्वीय सहाय्यक होतो त्यामुळे माझे चिखली तालुक्यातील बहुतांश स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांशी जवळून ओळख होती व त्यानंतर मी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत त्यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून गेल्या तीन वर्षांपासून संघटनेत काम करत असल्याने या ही संघटनेतील सर्वच कार्यकर्त्यांशी माझी जवळीक असून माझ्याविषयी पुरेपूर माहिती चिखली तालुक्यातील स्वाभिमानी व रयतच्या कार्यकर्त्यांना असल्याने मला पुरेपूर ओळखणाऱ्याच व्यक्तीचे हे काम असू शकते असे बयाण चिखली पोलीस स्टेशनचे आघाव साहेब व बाहेकर साहेब यांच्याकडे संदीप मुळे यांनी दिलेले असून सदर सोमठाणा ग्रा पं सचिव यांनी माझा कोणावर ही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे ,सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चिखली पोलिस स्टेशनने सदर जबाबाअंती त्या अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 नुसार गुन्हा दाखल केला असून या कलमाद्वारे जो कोणी इतर अन्य व्यक्तीची मानहानी करेल त्या व्यक्तीस दोन वर्षासाठी कारावासाची शिक्षा किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही ही शिक्षेस न्यायालय पात्र ठरूवु शकतात व सदर व्यक्तीने माझ्या व रयत क्रांती संघटनेच्या नावाचा वापर करून खंडनी वसूल करण्याच्या उद्देशाने माहितीचा आधिकार टाकलेला असल्याने चौकशी अंती समोर आलेल्या त्या व्यक्तीवर 50 लाखाचा मानहानीचा दावा टाकणार असल्याचे संदीप मुळे यांनी सांगितले,यावेळी रयत क्रांती संघटनेचे जितू अडेलकर,प्रशांत ढोरे पाटील,तुषार काचकुरे,दीपक सुरडकर,सचिन पडघान आदी रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.