अनोळखी नंबर ओळखण्यासाठी गूगल लवकरच आणणार नवीन अॅप नवी दिल्ली : आता गूगल तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन अँप ‘ट्रू कॉलर’ला आता गुगल रिप्लेस...
अनोळखी नंबर ओळखण्यासाठी गूगल लवकरच आणणार नवीन अॅप
नवी दिल्ली : आता गूगल तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन अँप ‘ट्रू कॉलर’ला आता गुगल रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे. Phone by Google चे नवीन व्हर्जन गूगल लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे. या आगामी मोबाइल अॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. तसेच, कंपनी या अॅपद्वारे ट्रू कॉलरअॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.
मोबाइल इंडियनच्या एका वृत्तानुसार, रेडडिटरने गुगलच्या या आगामी कॉलिंग अॅप गुगल कॉलला यूट्यूबच्या जाहिरातीवर स्पॉट केले आहे. युट्यूबवर पाहिलेल्या या जाहिरातीमध्ये ‘lets you answer with confidence’ अशी टॅगलाइन वापरली आहे.
गुगलने अद्याप गुगल कॉल लाँचिंग करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे अॅप सुरू होईल, अशी आशा आहे. दरम्यान, गुगलचा फोन अॅप अँड्राईड युजर्ससाठी आहे. या अॅपची खास गोष्ट म्हणजे, फोन स्क्रीन लॉक झाल्यानंतरही युजर्सला कॉलरच्या नावाची माहिती समजते. कंपनीने अलीकडेच या अॅपसाठी अनेक फीचर्स जारी केले होते.