मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयां...
मुंबई :
आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम हाती घेतली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर विदेशातून परतलेल्या प्रताप सरनाईक यांनी, ‘फाशी दिलीत तरी चालेल पण तोंड बंद करणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यापुढे काही सवाल उपस्थित केले आहेत.
ठाकरे सरकारमधील नेतेमंडळी राजकीय दवाब आणून घोटाळे लवपण्याचा प्रयत्न करत आहेत का? तुमची संपत्ती विदेशात कशी काय? घोटाळेबाजांशी तुमचे संबंध काय? तुमच्याकडे बेनामी संपत्ती किंवा तुमचं बेनामी उत्पन्न आहे का? या महत्त्वाच्या प्रश्नांची प्रताप सरनाईक यांना उत्तरं द्यावीच लागतील, असे किरीट सोमय्या ट्विटरवरील व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाले. तसेच, कोणताही नेता किंवा वैयक्तिक व्यक्ती हा कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे ईडीच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील, असेही सोमय्या यांनी ट्विट केले.