Breaking News

ज्या ठिकाणी धर्म असेल त्या ठिकाणी जय निश्चित : माधवकृष्ण प्रभुजी

ज्या ठिकाणी धर्म असेल त्या ठिकाणी जय निश्चित : माधावकृष्ण प्रभुजी
-----------
स्पिरुटेक हेल्थकेलर उद्घाटन सोहळा संपन्न
-------------


कोपरगाव/प्रतिनिधी :
ज्या ठिकाणी कृष्ण आहे त्या ठिकाणी धर्म आहे,ज्या ठिकाणी धर्म असेल त्या ठिकाणी जय निश्चित आहे.असे प्रतिपादन इस्कॉन टेम्पल नाशिकचे श्रीमान. माधवकृष्ण प्रभुजी यांनी केले.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे स्पिरुटेक हेल्थकेअर व पद्मागंध लाकडी घाण्याचे शुध्दतेल या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


यावेळी बापूसाहेब घेमुड(मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम सहकारी बँक), डॉ. शशिकांत भोरकडे. ओनर (अक्विजिन बायो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे)  समाधान दहिकर सर(प्राचार्य संजीवनी कॉलेज कोपरगाव), शैलेश देशमुख (कृषी विद्या विभाग प्रमुख बाभळेश्वर), नवले (कृषी अधिकारी येवला),  विनायक कोते. (अप्पर आयुक्त महानगरपालिका धुळे.)  नवनाथ माधव जाधव (चिफ अकाउटंट पी.डब्लू. डी.मालेगाव) अतुल जगदाळे, प्रमोद खोडदे , जुबेर पठाण, प्रदीप जाधव उपस्थित होते.


  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंगळे मॅडम, प्रास्ताविक ऋषिकेश भोरकडे यांनी व आभार श्रावण भोरकडे यांनी मानले.