Breaking News

वडनेर हवेली येथे सातत्याने आढळत आहेत बिबट्या;पाळीव प्राण्यांवर केले आहेत हल्ले.

वडनेर हवेली येथे सातत्याने आढळत आहेत बिबट्या;पाळीव प्राण्यांवर केले आहेत हल्ले.
------------------
तालुक्यात समाज माध्यमांवर बिबट्या व वाघाचे व्हिडिओ शेअर केल्याने अफवांचे पीक जोमात.
--------------------
पाथर्डी येथील घटनेचा विचार करता तालुक्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून वेळीच उपाययोजना कराव्यात.
-----------------
तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये - वनरक्षक अश्विनी साळुंके 


पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्या अनेक जणांनी पाहिला आहे या बिबट्याने वासरू शेळ्या फस्त केले आहेत वनविभागाने येथे एक पिंजरा लावला आहे मात्र या पिंजऱ्यामध्ये अद्याप बिबट्या कैद न झाल्याने व तो परिसरातील नागरिकांना दिसत आहे त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.
वडनेर हवेली येथे दि.२ रोजी रात्री ७:३०च्या सुमारास गावातील तरुण संजय बढे विजय सोनूळे विक्रम भालेकर अक्षय रोकडे सुनील बढे यांना बिबट्या चे दर्शन झाले त्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला त्यानंतर दि ३ रोजी सकाळी १० वाजता रामचंद्र भालेकर यांना शेतामध्ये काम करत असताना बिबट्या दिसला त्यानंतर दुपारी दोन वाजता तबाजी भालेकर यांना शेतात पाणी भरत असताना त्याची दोन पिल्ले  दिसली त्यामुळे गावामध्ये बिबट्या बाबत पुन्हा उलट-सुलट चर्चा झाल्या व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाने दोन दिवसापूर्वी गावामध्ये पिंजरा लावला आहे मात्र या पिंजऱ्यात बिबट्या गेला नाही त्यामुळे पिंजरा दुसऱ्या जागी हलवण्यात आला त्यामुळे परिसरात बिबट्या बाबत दहशत निर्माण झालेली आहे शेतकरी रात्री-अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी जातात बिबट्याच्या भीतीपोटी त्यांना जीव मुठीत धरून शेताला पाणी द्यावे लागत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्या याच भागात सतत आढळून येत आहे अनेकांनी बिबट्या पाहिला आहे तसेच गावातील काही पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे त्या बिबट्या सोबत दोन पिल्ले असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे तसे पायाचे ठसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये निदर्शनास आले आहेत त्यामुळे पिंजरा लावण्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमतः असमर्थता दर्शवली होती मात्र ग्रामस्थांच्या आग्रहामुळे पिंजरा लावण्यात आला आहे मात्र त्या पिंजऱ्या कडे बिबट्याने पाठ केली असून बिबट्या इतरत्र आढळून येत आहे त्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
गेल्या महिनाभरापूर्वीच बिबट्याने मुंगशी येथे एका तरुणावर रात्री झोपलेला असताना हल्ला केला त्या हल्ल्यात तरुण गंभीर रित्या जखमी झाला होता त्यानंतर वडनेर हवेली पारनेर मध्ये  बिबट्या आढळला आहे तसेच जामगाव मध्ये काही तरुणांनी बिबट्या पाहिला असून त्या बिबट्याने तेथे पाळीव प्राण्यांवर हल्ला देखील केला आहे अशी माहिती समजते.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी वडनेर हवेली येथील तरुण पोपट भालेकर रात्री चार वाजता बिबट्याने हल्ला केली असल्याची माहिती तरुणाने दिली यामध्ये त्याच्या पायाला जखम झाली तसेच तो हल्ला केल्यानंतर गाडीवरून पडला असे त्यांनी सांगितले मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तेथे भेट दिली तसेच त्याच्या जखमा पाहिल्यानंतर वनरक्षक अश्विनी साळुंके यांनी सांगितले की त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला नसून तो गाडीवरून पडल्यानंतर त्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत संभ्रमावस्था आहे.

तालुक्यात बिबट्या व वाघ यांचे व्हिडिओ शेअर करून अफवा!
तालुक्यात पट्टेरी वाघ असल्याचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी एका ग्रुपवर व्हायरल करण्यात आला होता मात्र आपल्या भागामध्ये अशा प्रकारचा पट्टेरी वाघ च नाही असे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच बिबट्याचा ही व्हिडीओ काही ग्रुप वर व्हायरल करण्यात आला पण तो बिबट्याचा व्हिडिओ आपल्या तालुक्यातील नाही असे पडताळणी केल्यानंतर उघड झाले आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी बिबट्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
    काही भागात अफवा तर काही भागांमध्ये खरोखर बिबट्या दर्शन देत आहे यामध्ये वडनेर हवेली पारनेर शहर जामगाव या भागात सातत्याने बिबट्या आढळत आहे काही प्रमाणात या बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे अद्याप मुंगशी वगळता माणसावर बिबट्याने हल्ला केलेला नाही तरीही पाथर्डी येथील घटनेचा विचार करता आपल्या तालुक्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत खबरदारी म्हणून उपाय योजना करणे गरजेचे आहे.
 तालुक्यामध्ये वडनेर हवेली येथे बिबट्याचा वावर आहे त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे मात्र सोशल मीडियावर बिबट्या व वाघाचे व्हिडिओ टाकले जात आहेत ते या भागातील नाहीत या भागात वाघ नाही तसेच बिबट्याचे व्हिडिओ येथील नाहीत त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
-------------
अश्विनी साळुंके 
वनरक्षक पारनेर