Breaking News

फटाके फोडून प्रदूषण करण्या पेक्षा दिव्यांची आरास करून सण साजरा करावा - तहसिलदार ज्योती देवरे

फटाके फोडून प्रदूषण करण्या पेक्षा दिव्यांची आरास करून सण साजरा करावा - तहसिलदार ज्योती देवरे.
--------------
नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन.
---------------
फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांना श्वसनाचा त्रास बनवण्याची शक्यता.
----------------
दुसरी लाट येण्याचा संभव त्यामुळे प्रशासनाने केलेल्या सूचनांचे नागरिकांनी अनुपालन करावे.


पारनेर प्रतिनिधी : 
या आठवड्यामध्ये दिवाळी हा सण असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे व दिवाळी सणानिमित्त फटाक्यांची मोठी आतिषबाजी होते त्यामुळेही कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे या धर्तीवर तहसिलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच दिपावली हा सण साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन तालुक्यातील नागरिकांना केले आहे.
 तहसीलदार देवरे यांनी सांगितले की राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे ऋण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत चालू वर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे सात-आठ महिन्यामध्ये आलेले सर्व सण सर्वधर्मियांनी अत्यंत साध्या पद्धतीने एकत्र न येता साजरे केलेले आहेत त्याच पद्धतीने दीपावलीचा उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करावा कोरोना संसर्गामुळे राज्यात बंद करण्यात आलेली मंदिरे अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत त्यामुळे साजरा होत असलेला दीपावली उत्सव हा घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची काळजी नागरिकांनी घ्यावी उत्सव कालावधीत विशेषत ज्येष्ठ नागरिक लहान मुले गरोदर महिला त्यांनी शक्यतो घराबाहेर पडण्याचे टाळावे तसेच नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर सोशल डिस्टन्स पाळावे दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो या उत्सवादरम्यान दरवर्षी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिशबाजी करण्यात येते त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तशेच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम दीपावली झाल्यानंतरही बरेच दिवस दिसून येतात कोरोना आजार झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन अधिक त्रास बळवण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे त्या ऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करून हा उत्सव साजरा करावा या उत्सवादरम्यान कोणतेही सार्वजनिक उपक्रम करू नये जसे की दिपावली पहाट पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये करावयाचे झाल्यास ऑनलाईन केबल नेटवर्क फेसबूक व्हाट्सअप इत्यादी माध्यमातून त्याचे प्रसारण करावे सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य विषयक शिबिरे घ्यावीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे कोरोना मलेरिया डेंगू इत्यादी आजार व त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय स्वच्छता याबाबत जनजागृती करावी या कार्यक्रमाला देखील गर्दी होणार नाही हे कटाक्षाने पाळावे अशा प्रमाणे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीचे पालन करणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे संबंधित नगरपंचायत पोलीस व स्थानिक प्रशासन आम्ही वेळोवेळी या सूचना नागरिकांना करत आहे त्या सर्वांचे अनुपालन नागरिकांनी करावे व दिवाळी हा उत्सव एका साध्या पद्धतीने दिव्यांची आरास करून साजरा करावा त्यामुळे ज्या कोरोना सोबत आपण लढाई लढत आहोत त्यापासून आपण सर्वांचा बचाव करू शकतो व सर्वांचे संरक्षण करू शकतो असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.


 दिवाळी सण आला आहे हे खरे असले तरी कोरोना ची दुसरी लाट येण्याचा संभव आहे ही बाब देखील खरी आहे त्यामुळे जी संसर्गजन्य परिस्थिती आपल्याकडे उद्भवलेली आहे त्या अनुषंगाने या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.
---------------
ज्योती देवरे 
तहसिलदार पारनेर