कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंदेल...
कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण
मुंबई :
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. तसेच 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकून समाजात द्वेष आणि जातीय तणाव निर्माण केल्याप्रकरणी दोघींविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी दोन्ही बहिणींना तीन वेळा पोलिसांसमोर हजर होण्यासाठी समन्स बजावला होता मात्र तीनही वेळी त्यांनी तो धुडकावला. आता त्यांनी आपल्याबाबतची एफआयआर रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली.
आज कंगना आणि रंगोलीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, एफआयआर बाबत दोन्ही बहिणी सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कोणतीही टिपण्णी करणार नाहीत. याबाबतची पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत तरी कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र त्याआधी दोघींना 8 जानेवारी रोजी पोलिसांसमोर हजर राहावे लागेल.