शेतकरी कामगार विद्यार्थी व युवकांच्या मागण्यांचा ही समावेश वडवणी। प्रतिनिधीः- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वडवणी येथे आज देशव्या...
शेतकरी कामगार विद्यार्थी व युवकांच्या मागण्यांचा ही समावेश
वडवणी। प्रतिनिधीः-
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वडवणी येथे आज देशव्यापी संपामध्ये सक्रिय सहभागी होऊन शेतकरी,कामगार, युवक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांचे निवेदन वडवणी तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आले यावेळी कॉ. रवी दादा उरुणकर, कॉ.अजय खिरे व कार्यकर्ते उपस्थित होते. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, देशातील सर्व शेतकरी,कामगार, विद्यार्थी व युवकांच्या संघटनांनी दिलेल्या देशव्यापी संपाच्या हाकेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वडवणी शाखेने सक्रिय सहभाग घेतला, यावेळी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न व शेतकरी,कामगार, विद्यार्थी व युवकांच्या मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना तहसीलदारांद्वारे पाठवण्यात आले.यामध्ये शेतकरी व कामगार विरोधी कायदे आणि वीज विधयेक तात्काळ रद्द करा, पिक विमा योजना सर्वकष करून त्याचा फायदा विमा कंपन्या न देता शेतकर्यांना द्या, कोरोना काळातील वीज बिल माफ करा, युवकांना नोकरी व रोजगार उपलब्ध करून द्या, गरजूंना दहा किलो रेशन द्या, बँक विमा रेल्वे व इतर क्षेत्रातील खासगीकरण तात्काळ बंद करा. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.