Breaking News

लोहगाव येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी

लोहगाव येथे एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी 


कोल्हार :-
राहाता तालुक्यातील लोहगाव  तांबेनगर येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम सोने-चांदी ,लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला मध्यवस्तीत केलेल्या या धाडसी चोरीमुळे तांबेनगर मधील रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहे याबाबत लोणी पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की ,लोहोगाव तांबेनगर मधील रहिवाशी मंगल दादा आहेर, विजय देविदास ननवरे ,महेश राजू कदम,निलेश धीरज चरावंडे ,मीना पाटोळे ,बत्तीशे यांच्या कडे घरफोडी  केली.
तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी निलेश धीरज चरावंडे यांच्या घराच्या पाठीमागे बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाची उचकापाचक करून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे व चांदीचे दागिने असा 60 ते 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला 
महेश राजू कदम यांचे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून 60 हजार रुपये व सोने-चांदी घेऊन पोबारा केला राजू कदम व त्यांचे कुटुंब हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते 
मंगल दादा आहेर यांच्या घरातून चोरट्यांनी 43 हजार रुपये रोख व सोने-चांदी चोरून नेले 
विजय ननावरे यांच्या व बत्तीशे यांच्या घरी या चोरट्यांनी डल्ला मारला गुंगीचे औषध फवारून चोरट्यांनी या चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले लोणी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील ,विखे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब चेचरे ,रिपब्लिकन पार्टीचे उत्तर नगरचे सचिव महेश सुरडकर, लोहगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश चेचरे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव चेचरे , शशिकांत पठारे ,शांताराम चेचरे , प्रसाद गायकवाड,आर एन सुरडकर आदींनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळी डॉग स्कॉड ,फिंगर प्रिंट तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते .
चोरटे चोरी करीत असताना सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती भाऊसाहेब चेचरे यांनी दिली. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.