$type=ticker$snippet=hide$cate=0

अहमद पटेल यांचे निधन

काँग्रेसचे राजकीय धुरंदर हरपले! - कोरोनाने घेतला काँग्रेसच्या दिग्गजाचा बळी नवी दिल्ली/ प्रतिनिधी  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाध्यक्षा ...

काँग्रेसचे राजकीय धुरंदर हरपले!

- कोरोनाने घेतला काँग्रेसच्या दिग्गजाचा बळी


नवी दिल्ली/ प्रतिनिधी 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसने एक धुरंदर नेता गमावला असून, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. पटेल यांचे सुपुत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या निधनाची बातमी ट्वीटरद्वारे दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. 

अहमद पटेल हे काँग्रेसचे दिग्गज राजकारणी होते. स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी व विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते अत्यंत विश्‍वासू होते. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडानखडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसेच जेव्हा पक्षहिताचा प्रश्‍न यायचा, तेव्हा सोनिया गांधी या अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचे स्थान होते. ते सोनियाजींचे राजकीय सल्लागारदेखील होते. अनेकवेळा त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर आली. परंतु, त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेतच काम करणे पसंत केले.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4162,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15403,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12504,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अहमद पटेल यांचे निधन
अहमद पटेल यांचे निधन
https://1.bp.blogspot.com/-9FDkNOtC_js/X74ohiYIP8I/AAAAAAABlrM/-N7SCdfgUcgK7xjfsh-XCP4rgvOUvEy4ACLcBGAsYHQ/w640-h610/ahmed%2Bpatel.jpg
https://1.bp.blogspot.com/-9FDkNOtC_js/X74ohiYIP8I/AAAAAAABlrM/-N7SCdfgUcgK7xjfsh-XCP4rgvOUvEy4ACLcBGAsYHQ/s72-w640-c-h610/ahmed%2Bpatel.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_912.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_912.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content