Breaking News

वीजबिलं चुकीची नसतील तर भाजपने 'हे' प्रॉमिस द्यावं; नितीन राऊतांचं भाजपला आव्हान

 

वीजबिलं चुकीची नसतील तर भाजपने 'हे' प्रॉमिस द्यावं; नितीन राऊतांचं भाजपला आव्हान

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफीवरून युटर्न घेतल्यानंतर भाजपसह मनसे व इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसेने राज्य सरकारला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, भाजपने आज महिला कार्यकर्त्यांसह प्रकाशगडावर मोर्चा काढत वीजबिल माफी करावी यासाठी आक्रमक आंदोलन केलं.

लॉकडाऊन काळातील वीजबिल अंदाजे देण्यात आली यावेळी काहींना अव्वाच्या-सव्वा बिल आकारल्याचे समोर आले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी हे बिल भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान राऊतांनी भाजपला दिलं आहे. तर, केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे 28 हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलाला माफी देऊ, असं सांगतानाच भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा सल्ला देखील दिला आहे.