Breaking News

अल्पवयीन मुलीशी लग्न आले अंगलट, गर्भपात झाल्यामुळे फुटले बिंग

 

पुणे : 

अल्पवयीन मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानंतर तिचा गर्भपात झाल्यामुळे पतीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. नवाज ईब्राहिम शेख (वय 28, रा.भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूग्णालयात अल्पवयीन मुलगी बाळंतपणासाठी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिचा गर्भपात झाल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली होती.

त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित मुलीने प्रेमविवाह केला असल्याचे सांगितले. मात्र, ती मुलगी अल्पवयीन असल्याने पतीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यातंर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नवाजला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पाटील करत आहेत.