सटाणा (विका प्रतिनिधी ) : येथिल इनर व्हिल क्लब आॕफ सटाणा यांच्या वतीने नुकताच येथिल चौगाव बर्डी आदिवासी वस्तीवर ' आनंद वाटण्याचा, घा...
सटाणा (विका प्रतिनिधी ) : येथिल इनर व्हिल क्लब आॕफ सटाणा यांच्या वतीने नुकताच येथिल चौगाव बर्डी आदिवासी वस्तीवर ' आनंद वाटण्याचा, घासातला घास देण्याचा ' हा यशस्वी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आदिवासी, अल्पवयीन तरुणी यांच्या साठी विशेष कामे करणारी संस्था म्हणुन बागलाण तालुक्यात इनर व्हिल क्लब आँफ सटाणा ही संस्था ओळखली जाते. संस्थेच्या अध्यक्षा रुपाली जाधव यांनी सुत्रे हातात घेतल्यापासुन अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिपावलीच्या काळात तेथील गरजू लोकांना दिपावलीचा फराळ, लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांना कपडे, स्त्रीयांना साड्या तसेच तेथील विवाह जमलेल्या काही उपवर मुलींना कन्यादान चे साहित्य,, भांडे, रुखवत, साडी चोळी, इमिटेशन ज्वेलरी आदि देवून मोठ्या बहिणीचे कर्तव्य पार पाडले.
कोरोनाच्या महामारीच्या काळात काही गरीब कुटुंबातील लोकांनी दिपावली सन साजरा केला नाही मणुन आमच्या वतीने सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे अध्यक्ष रुपाली जाधव यांनी दै लोकमंथनशी बोलताना सांगितले.
या उपक्रमास सचिव साधना जाधव, पुनम अंधारे, रेखा वाघ, मिनाक्षी जाधव, कल्पना जाधव, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सुजाता बागुल, नलिनी जाधव, पल्लवी विसपुते, डॉ शोभा खैरनार, अंजली जाधव, यांनी आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका निता भावसार, संगिता सोनवणे, सुनिता आहिरे यांनी योगदान दिले.