पंढरपूर : शिवसेनेनं धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ख...
पंढरपूर : शिवसेनेनं धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खडसावलं आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यादरम्यान, चंद्रकांत पाटीलांनी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अपयशी ठरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. खरंतर, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच सामन्यात दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.