Breaking News

अन् मल्लिकाची भविष्यवाणी खरी ठरली

 

वॉशिंग्टन - भारतीय वंशाच्या कमला देवी हॅरिस या कृष्णवर्णिय सिनेटर महिलेची प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडले गेल्याने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. यातच अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि कमला हॅरिस यांचा एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये मल्लिकाने 2009 मध्ये कमला हॅरिस यांची भेट घेतल्यानंतर फोटो ट्विट करत कमला यांच्या राजकीय भविष्याविषयी अंदाज वर्तवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये मल्लिका शेरावतने एक चित्रपटाच्या निमित्याने सॅन फ्रान्सिस्कोच्या दौऱ्यावर गेली होती. यावेळी मल्लिकाने कमला हॅरिस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तिने कमला सोबत चा तिचा फोटो शेअर कमला हॅरिस यांना भेटले. त्या भविष्यात एक दिवस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात . असा राजकीय भविष्याविषयी अंदाज वर्तवला होता.

सध्या तिचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे काही नेटकऱ्यांनी तिच्या या ट्विट ला रिट्विट करून मजेशीर कमेंट करत आहेत.