महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 6 पैस...
महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 6 पैसे प्रतिलिटर महागले आहे. दिल्लीत पेट्रोलची नवीन किंमत प्रतिलिटर 81.59 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 16 पैसे प्रतिलिटर वाढ करण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीत आता डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.41 रुपये करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत असल्यानं वाहन चालकांना त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 81.59 रुपये, 83.15 रुपये, 88.29 रुपये आणि 84.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्याचबरोबर चार महानगरांमध्ये डिझेलचे दर अनुक्रमे 71.41, 74.98 रुपये, 77.90 रुपये आणि 76.88 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.