Breaking News

दोन दिवसांमध्ये तालुक्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह.

दोन दिवसांमध्ये तालुक्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह.
---------------
दीपावली मुळे संसर्ग वाढण्याचा धोका  नागरिकांनीं नियम काटेकोर पाळण्याचे तहसिलदारांचे आवाहन


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून च्या प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार १३ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पॉझिटिव्ह वाला मध्ये दि.६ रोजी मावळेवाडी १ पाडळी आळे २ कान्हूर पठार १ पारनेर शहर १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये समावेश आहे.
तर दि. ७ रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये देवीभोयरे ४ निघोज २ सांगवी सूर्या १ सिद्धेश्वर वाडी १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत मध्ये घट होताना दिसत आहे मात्र दीपावली सण तोंडावर असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे त्यातून प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असून प्रशासनाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे त्याचे काटेकोरपणे पालन करून कोरोना ला दूर ठेवण्यासाठी दीपावली उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी नागरिकांना केले आहे.