Breaking News

पारनेर तालुक्यात काल ९ अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात काल ९ अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यामध्ये काल दि .२ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील ९ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पॉझिटिव्ह अहवालात कुरुंद ३ देवीभोयरे २ कर्जुले हर्या २ पारनेर शहर १ कान्हूर पठार १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
तालुक्यात काही दिवसापासून रुग्ण संख्या कमी होत आहे तरीही काही गावांमध्ये सातत्याने रुग्ण आढळत आहेत पुढील आठवड्यामध्ये दिवाळी सण असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.