Breaking News

BREAKING | बिहारमध्ये ४५ जागांवर १०० पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर

 


पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजनी (Bihar Assembly Election 2020 voting result) आता अत्यंत रोमांचक स्थितीत येऊन पोहोचले आहे. नितिशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणत निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून सध्याचे कल जाहीर करण्यात आले आहेत. २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भारतीय जनता पक्ष ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र महत्वाची बाब म्हणजे जवळपास 47 जागांवर दोन उमेदवारांमध्ये 100 पेक्षा कमी मताधिक्याचे अंतर आहे.

नितिशकुमार मागील पंधरा वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. परंतु, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.