Breaking News

सलमान खान याचा 'राधे' सिनेमा OTT फ्लॅटफॉर्म वर नाही तर सिनेमागृहात 'या' दिवशी होणार रिलीज

 

सलमान खान याचा 'राधे' सिनेमा OTT फ्लॅटफॉर्म वर नाही तर सिनेमागृहात 'या' दिवशी होणार रिलीज

 

  सलमान खान (Salman Khan) याचा 'राधे' (Radhe) सिनेमा कोविड-19 (Covid-19) संकटामुळे ओटीटी (OTT) फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल, असे बोलले जात होते. परंतु, सिनेमाचा निर्मात्यांकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, आता राधे सिनेमाबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा OTT फ्लॅटफॉर्म वर नाही तर सिनेमागृहात रिलीज करण्यात येणार आहे.

फिल्म ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी राधे सिनेमाबद्दल चालेल्या चर्चेला आपल्या ट्विटच्या माध्यमातून पूर्णविराम दिला आहे. तरण यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राधे सिनेमा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची केवळ अफवा आहे. सिनेमा निर्मात्यांचा निर्णय स्पष्ट आहे. राधे सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. ईद 2021 ला रिलीज करण्याचा उद्देश आहे."  

सलमान खान याचा राधे सिनेमा यंदा ईद दिवशी रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शन स्थगित केले होते. मात्र त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली. त्यामुळे सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची चर्चा रंगत होती. परंतु. तरण आदर्श यांच्या ट्विटनंतर हा सिनेमा ईद 2021 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सध्या सलमान खान सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. सलमानचा ड्रायव्हर आणि 2 स्टाफ मेंबर्स कोविड-19 पॉझिटीव्ह आढळल्याने सलमान सह खान कुटुंबिय आयसोलेशन मध्ये आहेत.