आटपाडी / प्रतिनिधी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री सद्गुरू साखर कारखान्याची 10 लाख रुपये किमतीची 30 टन साखर दि. 7 डिसेंबर रोजी लंपास करण्...
आटपाडी / प्रतिनिधी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री सद्गुरू साखर कारखान्याची 10 लाख रुपये किमतीची 30 टन साखर दि. 7 डिसेंबर रोजी लंपास करण्यात आली आहे. याबाबत पुण्याच्या गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीच्या वतीने तुषार मेहता यांनी दोघांविरुध्द फिर्याद दिली आहे.
गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीने श्री सद्गुरू साखर कारखान्याकडून साखर खरेदी केली होती. त्यापैकी 30 टन साखर त्यांनी ओंकार कोळी (रा. पुणे) यांना रांजणगावच्या ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये पोहोच करण्याची करण्याची जबाबदारी दिली होती. ओंकार कोळी यांनी ट्रकच्या चालकास ही साखर पोहोच करण्यास सांगितले होते. चालकाने कागदपत्रे व लायसन्स देतो म्हणून सांगितले होते. परंतू त्याने नाव, पत्ता आणि कागदपत्रे न देता कारखान्यातून ही साखर ताब्यात घेतली. साखर घेताना त्याने चेहरा झाकून घेतला होता. ती साखर गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीने पोहोचली का नाही, याबाबत रांजणगावच्या कंपनीला विचारले. परंतू ती न मिळाल्याने तुषार मेहता यांनी ओंकार माळीसह अज्ञात वाहन चालकावर फसवणुकीची तक्रार दिली आहे