केज । प्रतिनिधीः- देशामध्ये आज दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने केज शहर शेतकरी कामगार पक्ष...
केज । प्रतिनिधीः-
देशामध्ये आज दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने केज शहर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बंद पुकारले होते या बंदला काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना रिपब्लिकन सेना,वंचित आघाडी, संभाजी ब्रिगेड,मानवत पक्ष, हामाल मापाडी,एम आय एम, जमियात उलमा,लहुजी सेना या संघटना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला जोरदार घोषणा बाजी करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदना मध्ये कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वरील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन सेच्या कार्यकर्त्यांनी केद्रसरकारचा पुतळा जाळुन घोषणाबाजी केली
देशव्यापी बंद मध्ये भाई मोहन गुंड रंजीतसिह पाटील हनुमंत भोसले नंदकिशोर मोराळे बाळासाहेब ठोंबरे पशुपतिनाथ दांगट रत्नाकर शिंदे प्रवीण शेप मुकुंद कणसे भाऊसाहेब गुंड किसन कदम अमर पाटील पिंटू ठोंबरे कविता कराड बळीराम सोनवणे चंद्रकांत खरात अनिल रांजणकर बाबा मस्के विनोद शिंदे बिभीषण इंगळे रज्जाक शेख बाबासाहेब आहिरे मंगेश देशमुख अशोक रोडे महेश गायकवाड दलील इनामदार शिवाजी ठोंबरे अविनाश काळे कबीर इनामदार अनिल गालफाडे तालेब इनामदार बिभिषन इंगळे भागवत पवार अशोक डोंगरे शेबाज फारोकी हानुमंत मोरे विशाल मुळे ईतर सहभागी होते शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्यांना श्रद्धांजली देऊन समारोप केला.
---------