कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्य...
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर हरकत घेण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. त्यासाठी येथील तहसील कार्यालयात मतदारांनी मोठी गर्दी केली होती. त्यानुसार सोमवारी तालुक्यातून 301 हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकाजवळ आल्याने आयोगाकडून मतदार याद्यांचा कार्यक्रम लावण्यात आला आहे. तर सरपंच आरक्षण अद्याप जाहीर झाली नाही. तरीही ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे.
तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची नावे पुढील प्रमाणे :- उंब्रज, सैदापूर, हजारमाची (ओगलेवाडी), पार्ले, बनवडी, वडोली-निळेश्वर, कोपर्डे हवेली, अंबवडे, भोळेवाडी, गमेवाडी, घोगाव, गोटेवाडी, हणबरवाडी, हरपळवाडी, (पान 1 वरुन) इंदोली, जिंती, कार्वे, काले, खालकरवाडी, कोणेगाव, मालखेड, म्होप्रे, साकुर्डी, मुंढे, रिसवड, शेळकेवाडी (म्हासोली), शेणोली, शेरे, शिंदेवाडी (विंग), सुर्ली, तासवडे, उंडाळे, विरवडे, वडगाव (उंब्रज), वहागाव, वाठार, विंग, अकाईचीवाडी, बनवडी, बेलवडे बु।, बेलदरे, बेलवडे हवेली, भुरभुशी, चौगुलेमळा (भैरवनाथनगर), गायकवाडवाडी, घारेवाडी, घोणशी, गोवारे, खराडे, कोळे, लटकेवाडी, मरळी, नांदलापूर, ओंड, पाचुंद, पाडळी (केसे), पाल, पेरले, पोतले, सवादे, शेवाळेवाडी, शिरवडे, शिवडे, टाळगाव, वस्ती साकुर्डी, वाघेरी, वाघेश्र्वर, वारुंजी, येरवळे, गोटे, निगडी, बामणवाडी, भरेवाडी, भवानवाडी, भुयाचीवाडी, चचेगाव, चिखली, चोरे, धोंडेवाडी, कालवडे, कामथी, करवडी, केसे, खोडशी, खोडजाईवाडी, खुबी, किरपे, कोडोली, म्हारुगडेवाडी, म्हासोली, नांदगाव, नवीन कवठे, साळशिरंबे, शहापूर, वसंतगड, येणके, वराडे, जखिणवाडी, शिरगाव, तांबवे, शेवाळवाडी (उंडाळे) या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.