मुंबई / प्रतिनिधीः कोरोना साथीच्या काळातही आता अर्थव्यवस्थेला वेग आला आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) च्या मते, ऑक्टोबर...
मुंबई / प्रतिनिधीः कोरोना साथीच्या काळातही आता अर्थव्यवस्थेला वेग आला आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) च्या मते, ऑक्टोबर महिन्यात ईपीएफओमध्ये 11.55 लाख नवीन नोंदणी आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये 7.39 लाख नवीन सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले. तथापि, सप्टेंबर 2020 च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. सप्टेंबरमध्ये 14.9 लाख नवीन कामगार संघटनेत सामील झाले.
ईपीएफओमध्ये नवीन कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण वर्षाकाठी 56 टक्क्यांनी वाढ झाली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण 39.33 लाख नवीन कामगार नोंदविले गेले. कोरोनामुळे बेरोजगारी वाढली. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये साडेदहा लाख, जुलैमध्ये सात लाख 48 हजार नवीन नोंदणी झाली. जूनमध्ये तीन लाख 85 हजार, तर मे महिन्यात ईपीएफओमध्ये तीन लाख 18 हजार नवीन नोंदणी झाली. यापूर्वी एप्रिलमध्ये केवळ 1.33 लाख नवीन नोंदणी करण्यात आल्या. ईपीएफओने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, या वर्षी मार्चमध्ये नवीन नोंदणी घटून पाच लाख 72 हजारांवर एकूण कामगारांची संख्या झाली होती.
फेब्रुवारी 2020 मध्ये 10.21 लाख नवीन लोक ईपीएफओमध्ये सामील झाले. कोरो विषाणूच्या साथीच्या आजारामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने ती कमी झाली. कामगारांची नवी नोंदणी होण्याऐवजी आहे त्या कामगारांत घट होत होती. एप्रिल 2020 मध्ये नवीन सदस्यांची संख्या नकारात्मक (-1,79,685) वर गेली, जी नोव्हेंबरमध्ये (-1,49,248) सुधारली. निगेटिव्ह झोनमध्ये जाण्याचा अर्थ म्हणजे ईपीएफओ सोडलेल्या लोकांची संख्या सामील झालेल्यांपेक्षा जास्त होती. कामगार मंत्रालयाच्या मते, 2020 च्या आसपास दोन लाख 40 हजार कामगार ईपीएफओतून बाहेर पडले. 2019-20 या आर्थिक वर्षात 78 लाख 58 लाख नवीन सदस्य जोडले गेले. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण 39.33 लाख नवीन ग्राहक कामगारांची नोंदणी झाली. ईपीएफओमध्ये दरमहा सरासरी 7 लाख नवीन सदस्य जोडले जातात. ईपीएफओने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 या वर्षात 78 लाख 58 हजार नवीन सदस्य ईपीएफओमध्ये जोडले गेले. मागील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ही आकडेवारी 61.12 लाख होती. ईपीएफओ 2018 पासून डेटा रिलीझ करीत आहे. ईपीएफओ एप्रिल 2018 पासून नवीन सदस्यांचे आकडे जाहीर करत आहे. त्यासाठी सप्टेंबर 2017 पासून डेटाचा समावेश करण्यात येत आहे. आकडेवारीनुसार सप्टेंबर 2017 ते एप्रिल 2020 या कालावधीत निव्वळ नवीन सदस्य किंवा ग्राहक एक कोटी 75 लाख आहेत. सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 दरम्यान ईपीएफओकडे एकूण 15 लाख 52 हजार नवीन अर्ज झाले.