धारूर । प्रतिनिधीः धारूर तालूक्यातील पाच ग्रामपंचायत चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होणार असून सरपंच निवड सदस्या...
धारूर । प्रतिनिधीः धारूर तालूक्यातील पाच ग्रामपंचायत चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होणार असून सरपंच निवड सदस्यातून होणार आहे. या निवडणूका मुळे राजकीय वातावरण चांगले तापत आहे.
धारूर तालुक्यातील जहागीरमोहा, कासारी, रुईधारूर, भोपा,कोथिंबीर वाडी अशा 5 ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून .15 डिंसेबरला निवडणूक अधिसुचना निघणार असून 23 ते 30 डिसेंबर असेल नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी, असून 31 डिसेंबर नामनिर्देशन पत्र छाननी, 4 जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार, 4 जानेवारी सायंकाळी चिन्ह व अधिकृत उमेदवार यादी जाहीर होईल 13 जानेवारी सायंकाळी 5 पर्यंत प्रचार करता येणार आहे., 15 जानेवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 मतदान होईल तर 18 जानेवारी मतमोजणी होईल सरपंच पदाची निवड ग्रामपंचायत सादस्यातून होईल.या ग्रामपंचायत पैकी काही ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असल्याने राजकीय वातावरण तापत आहे .प्रशासन या निवडणूका साठी सज्ज असल्याचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रामेश्वर सौवामी यांनी सांगीतले.