(नैराश्य)जीवनाचा शोध घेण्यासाठी निघाला तरुण सात महिण्याचा खडतर प्रवास अंबाजोगाई । प्रतिनिधीः- जीवनाचा अर्थ काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी का...
(नैराश्य)जीवनाचा शोध घेण्यासाठी निघाला तरुण
सात महिण्याचा खडतर प्रवास
अंबाजोगाई । प्रतिनिधीः-
जीवनाचा अर्थ काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी काटोल जिल्हा नागपूर येथील विशाल मनोज टेकाळे वय 21 वर्ष हा तरुण बी. बी. ए हॉस्पिटल आणि टुरिझम कॉलेज पदवी घेत इतरही अभ्यास पुस्तके वाचण्याचा छंद लागल्यामुळे पुस्तके वाचत वाचत यातून आलेले नैराश्य जीवनाचा पडलेला प्रश्न यासाठी हा तरुण 21 व्या वर्षी घरची परिस्थिती जेमतेम असताना व वडील रुग्णवाहिका व्यवसाय व शेतीवर उपजीविका भागवत असतात विशालला नोव्हेंबर 2019 मध्ये दि बोन विधिन पुस्तक लिहीत असताना त्याला प्रश्न पडला की जीवन नेमकी कशासाठी आहे ते कसे जगता येईल यासाठी हजारो वर्षापासून जे जुने ऐकीवात असलेले व प्रचलित आहेत त्यावरच आपली वाटचाल आहे मात्र आपण स्वतःच्या मनावर कधी चालणार यासाठी स्वतःची बुद्धी चालावी इत्रांनी सांगितले त्यावर मार्गक्रमण न करता आपणच आपल्या जीवनाचा शोध घ्यावा यासाठी घराबाहेर पडला आहे. घरातून दोन ड्रेस एक सायकल दहा हजार रुपये घेत नागपुर अमरावती अकोला सांगली बुलढाणा जालना उस्मानाबाद सोलापूर सांगली बीड मार्गे लातूर येथून दक्षिण भारतात जाणार आहे बीड येथे आले असता गेवराईतील सहारा अनाथालय येथील गर्जे सरांसोबत त्याची ओळख झाली परिचय झाला व तेथेच गर्जे सरांनी त्यास म्हटले की तुला जीवनाचा अभ्यास करायचा आहे तर स्वतःजवळ एक रुपयाही न घेता तू भारतभ्रमंतीतिचा प्रवास कर ही गोष्ट पटल्यामुळे त्याने आपल्याजवळील असलेले दहा हजार रुपये सहारा अनाथालयाला दान करून टाकले व एक रुपयाही न घेता आपली सायकल घेऊन तो भारत भ्रमंतीसाठी निघाला आहे. आज अंबेजोगाई शहरांमध्ये त्याच्या प्रवासाचा 200 वा दिवस आहे या प्रवासामध्ये त्यासअनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला 13 जून 2020 रोजी घरच्यांना मी महाराष्ट्र भ्रमण करणार आहे म्हणून निघालेला विशाल पुढे सायकलवर भारत भ्रमंती करणार असून करणार आहे ही गोष्ट माध्यमातून घरच्यांना कळल्यामुळे घरचे हवालदील आहेत व त्यास यापासून रोखण्याचा जर प्रयत्न केला तर आपला मुलगा आपला फोन उचलणार नाही किंवा भेट घेणार नाही त्यामुळे घरचे म्हणतात काळजी घेऊन चाल रे बाबा या प्रवासात प्रवासामध्ये विशालला कोरोना असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे व तो नागपुर येथून निघाल्यामुळे व मजल दर मजल प्रवास करत असल्यामुळे दररोज 80 ते 120 किलोमीटरचा प्रवास करतो आहे यामध्ये तो ज्या गावात थांबेल किंवा ज्यांच्याकडे राहील तो त्यांच्याकडली कामे करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये तो मजूर वर्गाच्या घरी राहिला त्यांच्यासोबत मजुरी केली शेतकरी कुटुंबात राहिला शेतीचे काम केले पेंटिंग करणाराचे येथे राहिला तर पेंटिंग वेलडींग केलेले बिझनेस मॅनच्या इथे राहिला तर उद्योग कसा करतात यासह इतर कामे शिकण्याचा प्रयत्न करत जिवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे
सात महिन्यातील कठीण प्रसंग
कणकवली येथून पुढे पंढरपूर कडे जात असताना कोरोना परिस्थीतीमुळे पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये त्यांनी मी भारतभर फिरण्यासाठी निघालो आहे मला जेवणाची गरज आहे मला जेवण मिळेल का इथे थांबायला मिळेल का असे म्हणून गावकर्यांना विचारले असता गावकर्यांनी त्यास येथे थांबू नको पुढच्या गावात जाऊन थांब असे दोन-तीन गावातील गावकर्यांनी त्यास थांबू दिले नाही व हाकलून दिले त्यामुळे रात्र घालवण्यासाठी त्याला उघड्या समशान भूमीमध्ये भर पावसात भिजत उपाशीपोटी रात्र घालवावी लागली हा या दोनशे दिवसातील अत्यंत कटू प्रसंग आहे.
अंबाजोगाई येथे आला असता त्याला वेगळा अनुभव मिळाला
अंबाजोगाई येथे मानवलोक कार्यालय येथे त्याचा दोन ते तीन दिवसांचा मुक्काम राहिला यामध्ये जनसहयोगचे शाम सरवदे यांनी शहरातील घर नसलेली व्यक्ती अंथरूण पांघरून नसलेले व्यक्ती मनोरुग्ण यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली व या भेटीमध्ये त्यास एक मनोरुग्ण असा भेटला की तो इतर कोणाशी बोलत नाही मात्र श्याम सरवदे यांनाच बोलतो व त्यांनी आणलेली खिचडी आपण स्वतः प्रथम न खाता दवाखाना परिसरातील फिरतात त्यापैकी एक वराह(डुक्कर) आहे सोबत त्याची मैत्री जमली आहे वराह झोपताना हा बरं त्या मनोरुग्णा सोबतच उषाखाली झोपतो मनोरुग्ण आपल्याला आणलेली खिचडी स्वतः अगोदर न खाता अर्धी त्या वराहाला खाऊ घालून नंतर आपण खातो या प्रसंगामुळे स्वतःच्या जीवाची भूक भागत नाही तो अर्धपोटी राहून दुसर्याची भूक भागवतो हा प्रसंग माझ्या जीवनात आयुष्यभर मला शिकवत राहील असे अभिमानशी बोल.