सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसरा आणि अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळवला जाणार आहे. दुपारी 1 वाज...
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसरा आणि अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळवला जाणार आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सिडनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाईल. पहिले दोन्ही टी-ट्वेन्टी सामने जिंकत भारताने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. आता अखेरचाही टी-ट्वेन्टी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लिनस्विप देण्याचा भारताचा निर्धार असेल तर शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत मालिका 2-0 ने खिशात घातली. त्यामुळे तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरण्याअगोदर भारताचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. याउलट पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास डळमळीत असेल. शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन सामना जिंकण्याचं आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर असेल.लागोपाठ दोन टी-ट्वेन्टी सामने जिंकल्यामुळे भारतीय संघात तिसऱ्या सामन्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात के.एल. राहुलला विश्रांती देऊन त्याच्याजागी संजू सॅमसनला ओपनिंगला खेळण्याची संधी मिळू शकते. तर के.एल. राहुलच्या जागी मनीष पांडेला संधी मिळू शकते.ऑस्ट्रेलिया संघातही तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यासाठी काही बदल होऊ शकतात. संघात विकेटकीपर बॅट्समन अॅलेक्स कॅरीचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. जर संघात नियमित कर्णधार अँरॉन फिंच परतला तर अॅलेक्स कॅरीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय दुसऱ्या टी-ट्वे्न्टी सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 रन्सनी विजय पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने बाजी मारली होती. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू समॅसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकुर. ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एलेक्स कॅरी, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सैम्स, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, अॅडम झॅम्पा, मिशेल स्वेपसन आणि नॅथन लायन