नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक...
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर आगामी 30 जानेवारीपर्यंत प्रतिबंध कायम ठेवला आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील निर्बंध वाढविल्याचे परिपत्रक जारी केले आहे.
केंद्र सरकारच्या या परिपत्रकानुसार 30 जानेवारी 2021 पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवेवर निर्बंध लागू राहणार आहेत. मात्र, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान वाहतुक सेवेचा समावेश नाही. असे असले तरी नियोजीत आंतरराष्ट्रीय विमान उड्डांणांना ठराविक विमान मार्गावर परवानगी असणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगीही लागणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भारताने निवडक देशांशी एअर बबल करार करून विमान वाहतूक सेवा सुरू केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने टाळेबंदी घोषणा करताना 25 मार्च 2020 रोजी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवेवर निर्बंध लागू केले आहेत.