56 जणांवर कारवाई;विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई शेवगाव ः शहरातील जुगार अड्डयावर गुरुवारी पोलिसांनी कारवा...
56 जणांवर कारवाई;विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
शेवगाव ः शहरातील जुगार अड्डयावर गुरुवारी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील जुगार अड्डयावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रकाश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शेवगाव नेवासा रोडवर स्टेट बँक ऑफ शेवगाव, इनामदार यांच्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये जुगार खेळणार्या 55 लोकांवर नाशिक विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये देवीचंद बराडे, (आष्टी बीड़) उमेश कोटक, (राजकोट गुजरात) गणेश गाडे, (शेवगाव) गोवर्धन मजीठिया, (मीरा रोड मुंबई) मुनाफ शेख, (नायकवाड़ी मोहल्ला शेवगांव) राजू निकाळजे, (हाकेगाव शेवगाव) रफिक शेख (संजय नगर औरंगाबाद) अरुण राठोड, (कळस पिंपरी पाथर्डी) जाकीर शेख (इंदिरा नगर शेवगाव) सुभाष तुपे (बिडकीन पैठण) स्वप्निल थोरात (नेवासा अहमदनगर) अल्ताफ शेख, (दिलजले वस्ती शेवगाव) हरिदास सुपारे (खंडोबा नगर शेवगाव) भागिनाथ खर्चन, (आखेगाव शेवगाव) खरकु भोसले, (शेवगाव) रखमाजी कुसळकर (वडार गल्ली शेवगाव) गणेश शिनगारे (लोळेगांव शेवगाव) चंद्रकांत वैरागर (घोडेगाव नेवासा) सुनील धोत्रे (वडर वाडा शेवगाव,20) अंकुश लंबाटे घोटण(शेवगाव, 21) दत्तू होरशीळ (भीम नगर औरंगाबाद 22) सय्यद बशीर (कॉर्पोरेशन औरंगाबाद) सचिन आदमाने (कोर्ट समोर शेवगाव) नारायण फुंदे (ब्राह्मण गल्ली शेवगाव) श्रीकांत काळे (कुकाणा नेवासा) विष्णू लवघळे (गंगापूर औरंगाबाद) बप्पासाहेब विघ्ने (कोर्टाच्या मागे शेवगाव) अर्जुन चौधरी (धामणगाव बीड) पंडित कुसळकर (वडार गल्ली शेवगाव) शिवनाथ ढाकणे (मुर्शदपुर शेवगाव) राहुल पंडित (घोडेगाव नेवासा) गोरख हिवाळे (गंगापूर औरंगाबाद) नवनाथ खैरे (अमर वडगाव गंगापूर, औरंगाबाद)राजेश राठोड (सिद्धिविनायक कॉलनी शेवगाव) अल्ताफ इनामदार (नेहरूनगर शेवगाव) राजू दिनकर (पाथर्डी) पांडुरंग नवरंगे (आगडगाव गंगापूर) समुद् अहमद (समसूद कॉलनी औरंगाबाद) जफर हुसेन (सिद्धी चौक औरंगाबाद) रियाज शेख (रेणुका माता मंदिर औरंगाबाद) राहुल दिनकर (पाथर्डी) संजय चितळे (पाथर्डी) जलाल शेख (तिसगाव पाथर्डी) यावर खान पठाण (औरंगाबाद) अरुण कोलते (बाभुळगाव पाथर्डी) सचिन कोकळे (पुंडलिक नगर शेवगाव) योगेश जाधव (देवळाली नाशिक) अरबाज इनामदार (इंदिरा नगर शेवगाव) अमित शिंदे (धामणगाव आष्टी) कांतीलाल सुखधान सागर (वडगाव गंगापूर) विवेक घुले (नेवासा) मिनीनाथ भवार (कळस पिंपरी पाथर्डी) जावेद खान (जयसिंगपूर औरंगाबाद)अंबादास चितळे (चितळवाडी)अंबादास काळोखे (पाथर्डी) यांच्याविरोधात जुगार अधिनियम 45 नुसार कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एवढी मोठी कारवाई शेवगाव मध्ये कधीही झाली नव्हती. त्यामुळे ह्या कारवाईमुळे शेवगाव मध्ये खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथका मार्फत करण्यात आली. या कारवाईमध्ये एपीआय सचिन जाधव, पीएसआय संदीप पाटील, एएसआय राजेंद्र सोनवणे, पोका नितीन सकपाळ, उमाकांत खापरे, विश्वेश हजारे, चेतन पाटील, अमोल भामरे, नारायण लोहरे, सुरेश टोंगारे, इत्यादी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला. या कारवाईमध्ये मोटरसायकल मोटारकार सहित जवळजवळ 35 लाख 85 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.