$type=ticker$snippet=hide$cate=0

सिडकोसह, खासगी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी 4 चटई क्षेत्राचा प्रस्ताव

  नवी मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक इमारती या ...

 


नवी मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक इमारती या धोकादायक ठरत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या इमारतींची पुर्नबांधणी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. अखेर या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पूर्वी जे अडीच चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. त्या ऐवजी 4 चटई क्षेत्र मिळावे म्हणून बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी यापूर्वीच केली होती. आता तो प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. 

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित आणि खासगी धोकादायक इमारतीत राहणार्‍या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने 4 एफएसआयचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच येत्या नवीन वर्षात 4 चटई क्षेत्राची देखील नवी मुंबईतील नागरिकांना भेट मिळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 4 चटई क्षेत्राची मागणी केली होती. यानंतर सिडको व महापालिका प्रशासन यांच्या सोबत झालेल्या बैठकीनुसार सिडको आणि महापालिकेने शहरात कशाप्रकारे 4 चटईक्षेत्र कसे देता येईल, याचे नियोजन केले आहे. या प्रस्तावानुसार येत्या नवीन वर्षात नवी मुंबईकरांना 4 चटई क्षेत्राची भेट मिळणार आहे, अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली.


अडीच चटई क्षेत्र पुरेसे नाही

यापूर्वी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईत अडीच चटई क्षेत्राची मागणी केली होती. मात्र अडीच चटई क्षेत्र पुरेसे नसल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी 4 चटई क्षेत्राची मागणी केली. त्याची यासंदर्भात 16 नोव्हेंबरला बैठक झाली. त्यानंतर 10 डिसेंबर या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व सही झाली. त्यानंतर आता सिडकोचे एमडी याबाबतचा प्रस्ताव देतील. त्यानंतर आता सिडकोकडून 4 चटई क्षेत्रात विकास कामे कशी करु शकतो. व यासाठी किती चटईक्षेत्र लागेल याबाबत समिती गठीत केली आहे. त्याचा अहवाल तयार केला आहे, असे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या. याबाबत अनेकांशी चर्चा केली आहे. हा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, त्याला मान्यता मिळल्यानंतर इमारतींची पुनर्बांधणी केली जाईल. अडीच चटई क्षेत्रात कोणताही विकासक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी पुढे येत नव्हता, मात्र क्षेत्रामुळे नक्कीच हा प्रश्‍न सुटला जाऊन नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करता येईल, असा विश्‍वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,666,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12591,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सिडकोसह, खासगी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी 4 चटई क्षेत्राचा प्रस्ताव
सिडकोसह, खासगी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी 4 चटई क्षेत्राचा प्रस्ताव
https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9870090-1008-9870090-1607919989203.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/4.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/4.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content