नाशिक रोड : - नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विविध कामे सुरु असून निरनिराळे बदल करीत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सरकते जीने होत असून प्लॅटफॉ...
नाशिक रोड :
- नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विविध कामे सुरु असून निरनिराळे बदल करीत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सरकते जीने होत असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जुन्या तिकीट घरच्या वरच्या मजल्यावर चारशे लोक आराम करू शकतील असा हाॅल बांधण्यात येत आहे
नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख रेल्वे स्थानक समजले जाते या ठिकाणी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात इतर राज्यातही जाण्यासाठी नासिक रोड रेल्वेस्थानकावर गाड्या थांबतात सध्या तिकीट घराच्या पहिल्या मजल्यावर चारशे लोक थांबू शकतील असा हॉल बांधण्यात येत आहे . प्रवाशांची सुरक्षितता व स्वच्छता राखली जावी या उद्देशाने हा मोठा हॉल लवकरच कार्यान्वित होत असून या हॉलमध्ये महिला व पुरुषांची वेगळी सोय करण्यात आली आहे .पॅसेज मध्ये मुलांना खेळण्याची ही सोय करण्यात आली आहे . प्लेटफार्म क्रमांक चार वर सरकते जिने ची निर्मिती केली जात आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर सरकते जिने दीड वर्ष पूर्वीपासून बसवलेली आहे मात्र चार वर सरकते जिने नसल्यामुळे अनेक वेळा गरोदर माता वृद्ध व्यक्ती दिव्यांग बांधवांची फरफट होत होती त्यामुळे सरकते जिने प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर कार्यान्वित होत असून लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहेत.